आॅइल मिलला आग; लाखोंची हानी

By Admin | Updated: May 18, 2017 01:30 IST2017-05-18T01:30:16+5:302017-05-18T01:30:16+5:30

मंगरूळपीर : येथील कारंजा रोडस्थित बालाजी आॅइल मिलला बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

Aile mill fire; Loss of millions | आॅइल मिलला आग; लाखोंची हानी

आॅइल मिलला आग; लाखोंची हानी

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : येथील कारंजा रोडस्थित बालाजी आॅइल मिलला बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यामध्ये लाखो रुपयांच्या साहित्याची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मंगरूळपीर शहरातील कारंजा रोड मार्गालगत रमेश जाखोटिया यांच्या मालकीचा बालाजी आॅइल मिल आहे. या मिलला रात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच कारंजा व वाशिम येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मंगरूळपीर येथील अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मंगरूळपीर, कारंजा व वाशिम येथून अग्निशमन दलाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत मिलमधील लाखो रुपयांचे साहित्य आगीच्या विळख्यात खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.

Web Title: Aile mill fire; Loss of millions