कृषी संजीवनी मोहिमेचा आज समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:27 IST2021-07-01T04:27:27+5:302021-07-01T04:27:27+5:30

नुकतेच कृषी विभागामार्फत सन २०२० च्या रब्बी हंगामाचे रब्बी ज्वारी, गहू, हरभरा आणि करडई या पिकांसाठी सर्वसाधारण व आदिवासी ...

Agriculture revival campaign concludes today | कृषी संजीवनी मोहिमेचा आज समारोप

कृषी संजीवनी मोहिमेचा आज समारोप

नुकतेच कृषी विभागामार्फत सन २०२० च्या रब्बी हंगामाचे रब्बी ज्वारी, गहू, हरभरा आणि करडई या पिकांसाठी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीचे पीक स्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात आले. ०१ जुलै रोजी मुंबई येथे मंत्रालय, मुंबई येथे होणाऱ्या कृषी दिन कार्यक्रमामध्ये या राज्यस्तरीय रब्बी हंगाम २०२० मधील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या शेतकऱ्यांचा मा. मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते सत्कार होणार आहे. सदर कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, कृषिमंत्री, फलोत्पादन मंत्री, कृषी राज्यमंत्री, फलोत्पादन राज्यमंत्री, सचिव (कृषी) आणि आयुक्त (कृषी) यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. तसेच सदर कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री हे कृषी विभागाच्या रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाचे यूट्यूब चॅनेलवरून होणार असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकरराव ताेटावार यांनी केले आहे.

Web Title: Agriculture revival campaign concludes today