कृषी विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:37 IST2021-08-01T04:37:45+5:302021-08-01T04:37:45+5:30
शेतकऱ्यांना फवारणी तंत्रज्ञान व शास्त्रशुद्ध फवारणी कशी करावी, याचे प्रात्यक्षिक करताना, फवारणी करिता शेतकऱ्यांनी शुद्ध पाण्याचा वापर करणे आवश्यक ...

कृषी विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
शेतकऱ्यांना फवारणी तंत्रज्ञान व शास्त्रशुद्ध फवारणी कशी करावी, याचे प्रात्यक्षिक करताना, फवारणी करिता शेतकऱ्यांनी शुद्ध पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे.
औषध फवारणी वेळी शेतकऱ्यांनी तोंडावर मास्क, डोळ्यावर गॉगल तसेच हातात हातमोजे घालूनच फवारणी करावी, असे मार्गदर्शन केले. यावेळी शेतामध्ये शेतकरी किसन कड, माला गावंडे, कांता कड, माणिक शिंदे, देवराव ठाकरे, सुभाष गोरे उपस्थित होते. या प्रात्यक्षिकासाठी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अतुल मुराई व कार्यक्रम अधिकारी प्रा. शशिकांत वाकुडकर तसेच प्रा. डी. टी. बोरकर व इतर प्राध्यापक वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .
-------
शेतकरी शेतीशाळा मेडशी येथे
मेडशी : कोळदरा येथे २७ जुलै रोजी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन पिकावरील शेतकरी शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यासंदर्भात कृषी सहायक विलास ढवळे यांनी पाने खाणाऱ्या अळी चक्री भुंगा या किडी विषयी ओळख व माहिती शेतकऱ्यांना दिली. चक्री भुंगा जीवनक्रम नुकसानीची तीव्रता व करावयाच्या उपाययोजनांबाबत सखोल माहिती दिली. यावेळी सोयाबीन पिकाची पाहणी करून निरीक्षणे देऊन उपाययोजना करण्याचे आवाहन केले. या शेती शाळेला सरपंच पार्वतीबाई प्रमोद लठाड, उपसरपंच गजानन शिंदे, सुखदेव देवकर, सुरेश जावळे, शेतकरी होते.