मेडशी येथील कृषी उत्पन्न उपबाजारची इमारत अडगळीत
By Admin | Updated: August 5, 2014 20:10 IST2014-08-05T00:33:29+5:302014-08-05T20:10:55+5:30
मेडशी येथील उपबाजाराची दुरवस्था थांबता थांबेना, अशी गत झाली आहे.

मेडशी येथील कृषी उत्पन्न उपबाजारची इमारत अडगळीत
मालेगाव : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मेडशी येथील उपबाजाराची दुरवस्था थांबता थांबेना, अशी गत झाली आहे. कृउबासच्या इमारतीचे दरवाजे व खिडक्या काढून नेण्यात आल्या आहेत. उपबाजाराच्या आवारात असलेल्या कुंपनाचे अँगल व तारेचे अवशेषही शिल्लक नाहीत. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी होत आहे. शेतकर्यांना शेतमाल विक्रीला आणण्यासाठी सोयीचे जावे म्हणून गावपातळीवर कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत उपबाजार स्थापन केले जातात. याप्रमाणेच मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने शिरपूर व मेडशी येथे उपबाजार समितीची निर्मिती केली आहे. शिरपूर येथे बर्यापैकी उपबाजार सुरू असतो. शिरपूरच्या उपबाजाराला स्वतंत्र जागा, इमारत, कुंपन आहे. शिरपूर परिसरातील हजारो शेतकरी या उपबाजारात शेतमाल विक्रीसाठी आणतात. मात्र, मेडशी येथील उपबाजार समितीच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने व्यत्यय निर्माण होत आहे. मेडशी कृउबासच्या उपबाजाराची चार एकर जमीन आहे. या जमिनीत उपबाजाराच्या सभोवताल तारेचे कुंपन करण्यात आले होते. त्या कुंपनाचे अवशेषही आता शिल्लक नाहीत. या उपबाजारातील इमारतीची दुरावस्था झाली आहे. इमारतीला दरवाजे व खिडक्या नाहीत. इमारतीत घाणीचे साम्राज्य आहे. कृउबासने या उपबाजारातील इमारत व कुंपनाची देखभाल व्यवस्थित करणे गरजेचे होते. आता या इमारतीची दुरुस्ती त्वरित करण्याची गरज आहे. उपबाजाराच्या आवाराला तारेचे कुंपन करण्याची गरज आहे. मध्यंतरी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने मेडशी येथे गोदाम भाड्याने घेउन शेतमालाची खरेदी सुरु केली होती. गावापासून दूर अंतरावर उपबाजार असल्याने शेतकर्यांची गैरसोय होते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे गोदामाच्या भाड्याचा जास्तीचा भुदर्ंड सहन करून कृउबासने मध्यंतरी शेतकर्यांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला होता. आता उपबाजाराच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. या इमारतीची दुरुस्ती करुन शेतमाल खरेदी सुरू करणे गरजेचे आहे. मेडशी परिसरातील शेकडो शेतकर्यांना या उपबाजारामुळे दिलासा मिळाला होता. सदर उपबाजाराची इमारत दुरूस्त करणे गरजेचे आहे.