शेतकऱ्यांना कृषी हवामान आधारित पीक व्यवस्थापन प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:15 IST2021-03-13T05:15:34+5:302021-03-13T05:15:34+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे यांनी शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्रातील तांत्रिक ...

शेतकऱ्यांना कृषी हवामान आधारित पीक व्यवस्थापन प्रशिक्षण
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे यांनी शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्रातील तांत्रिक उपक्रमांची माहिती देऊन बदलत्या हवामान परिस्थितीत शेती संबंधित जागृत राहण्यासाठी कृषी हवामान आधारित सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रात कृषी हवामान विषयतज्ज्ञ रामप्रसाद नितनवरे यांनी विभागाचे माध्यमातून वाशिम जिल्ह्यातील तालुका पातळीवरील कृषी हवामान सल्ला सेवा व कार्य याबद्दल सांगितले. तसेच शेतकऱ्यांना मोबाईल आधारित कृषी हवामान सल्ला सेवेसाठी व्हॉट्सअॅप, फेसबुक, मोबाईल अॅप- ‘मेघदूत, दामिनी, मौसम, उमंग’ वापराची माहिती दिली. कृषी विद्या विषयतज्ज्ञ तुषार देशमुख यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान वैशिष्ट्ये - (कोरडे काळ, पावसाळी काळ), आधारभूत पीक व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन करताना हवामान बदलाचे प्रकार, दुष्काळ, शीत व उष्ण लहर, अवकाळी स्थिती संबंधित पीक नियोजन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, हरभरा पीक निहाय कीड रोग वातावरणीय संबंध व नियोजन, याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यक्रम सहाय्यक संगणक तज्ञ श्रीकृष्ण बावस्कर यांनी केले.