रस्त्याच्या मागणीसाठी महिलांचा आक्रमक पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:38 IST2021-02-14T04:38:07+5:302021-02-14T04:38:07+5:30

प्रभाग क्रमांक सातमधील समतानगर, अल्लाडा प्लॉट येथील रस्ते कच्च्या स्वरूपातील असून ओबडधोबड आहेत. विशेषत: पावसाळ्यात यामुळे सर्वत्र चिखल साचून ...

Aggressive consecration of women for road demands | रस्त्याच्या मागणीसाठी महिलांचा आक्रमक पवित्रा

रस्त्याच्या मागणीसाठी महिलांचा आक्रमक पवित्रा

प्रभाग क्रमांक सातमधील समतानगर, अल्लाडा प्लॉट येथील रस्ते कच्च्या स्वरूपातील असून ओबडधोबड आहेत. विशेषत: पावसाळ्यात यामुळे सर्वत्र चिखल साचून गैरसोयीचा सामना करावा लागतो. पक्के रस्ते नसल्याने या भागातील नागरिकांना ये-जा करताना अडचण निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना शाळा किंवा क्लास आटोपून घरी परतायला सायंकाळ होते. अशावेळी चक्क ओबडधोबड रस्त्याने व काट्याकुपाट्यांमधून वाट शोधत मुलांना घर गाठावे लागते. याच कारणांमुळे अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. रहिवाशांना होणारा त्रास लक्षात घेता रस्त्यांची कामे विनाविलंब हाती घ्यावी अन्यथा येत्या २ मार्चपासून नगर परिषद कार्यालयासमोर प्रभागातील नागरिक व महिला उपोषणास बसतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला. यावेळी रवी पट्टेबहादूर यांच्यासह प्रभागातील असंख्य महिला उपस्थित होत्या.

Web Title: Aggressive consecration of women for road demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.