शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी

By Admin | Updated: May 19, 2014 01:20 IST2014-05-19T01:19:37+5:302014-05-19T01:20:17+5:30

जुन्या शेतीच्या वादावरून दोन गटात हाणामारी होऊन एकजण गंभीर झाल्याची घटना घडली.

Aggressive conflict in two groups | शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी

शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी

अनसिंग: जुन्या शेतीच्या वादावरून दोन गटात कुर्‍हाड व काठीने हाणामारी होऊन एकजण गंभीर झाल्याची घटना अनसिंग पोलिस स्टेशनअंतर्गत येणार्‍या कृष्णा येथे १७ मे रोजी सायंकाळी ६ च्या दरम्यान घडली. या प्रकरणी १0 जणांविरुद्ध अनसिंग पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. अनसिंगपासून जवळच असलेल्या कृष्णा येथील फिर्यादी चिंतामण हरिभाऊ भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अशोक हरिभाऊ भालेराव, सिद्धार्थ अशोक भालेराव, चंद्रभागा अशोक भालेराव, दीपाली सिद्धार्थ भालेराव यांनी शेतीच्या वादावरून संगनमत करून जीवे मारण्याची धमकी देऊन दगड- काठीने मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध भादंवि ३२६, ५0४, ५0६, ३४ कलमानुसार अनसिंग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुसर्‍या गटातील फिर्यादी चंद्रभागा अशोक भालेराव रा. कृष्णा हिने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी रुखमाबाई हरिभाऊ भालेराव, विलास चिंतामण भालेराव, महादू पंडित भालेराव, कैलास चिंतामण भालेराव, चिंतामण हरिभाऊ भालेराव, लिलाबाई विक्रम भालेराव यांनी शेतीच्या वादावरून संगनमत करून फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देऊन, दगड-काठीने मारहाण करून जखमी केले. याबाबत दोन्ही गटांकडून परस्पराविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरून सदर सहा आरोपीवर भादंवि ३0७, १४७, १४८, १४९, ३२४, ५0४, ५0६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी फिर्यादी चिंतामण हरिभाऊ भालेराव गंभीर जखमी असून, त्यांच्यावर वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण मळघणे करीत आहेत.

Web Title: Aggressive conflict in two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.