भर दुपारी महिलेच्या हातातील पाटल्या लंपास
By Admin | Updated: May 5, 2016 03:20 IST2016-05-05T02:41:01+5:302016-05-05T03:20:16+5:30
वाशिम येथील घटना; १ लाख ८0 हजारांचा माल लंपास.

भर दुपारी महिलेच्या हातातील पाटल्या लंपास
वाशिम: नवृत्तिवेतन काढण्यासाठी बँकेत आलेल्या महिलेच्या हातातील सहा तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या लंपास करण्यात आल्याची घटना ४ मे रोजी भर दुपारी १ वाजता पाटणी चौक परिसरात घडली. या घटनेमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक सिव्हिल लाइन परिसरातील रहिवासी अरुणा गाडेकर या त्यांचे नवृत्तिवेतन काढण्यासाठी बँकेत आल्या असताना, दोन अनोळखी इसमांनी पोलीस असल्याची बतावणी केली आणि सुरक्षेच्या नावाखाली सहा तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्यांवर हात साफ केला. या दागिन्याची किंमत १ लाख ८0 हजार असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञात दोन आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ४२0, १७0, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.