आरक्षणानंतर इच्छुकांच्या मनसुब्यावर फेरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:39 IST2021-03-24T04:39:44+5:302021-03-24T04:39:44+5:30
होऊ घातलेल्या निवडणुकीत तळप या मतदार संघात दावे प्रतिदावे करीत मित्र पक्षाची अधिकृत तिकिटाचा दावेदार कसा सरस आहे हे ...

आरक्षणानंतर इच्छुकांच्या मनसुब्यावर फेरले पाणी
होऊ घातलेल्या निवडणुकीत तळप या मतदार संघात दावे प्रतिदावे करीत मित्र पक्षाची अधिकृत तिकिटाचा दावेदार कसा सरस आहे हे मतदार राजाला भुरळ घालतांना उमेदवार दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद भूषविलेल्या शोभा गावंडे, मानोरा पं. स.च्या माजी उपसभापती रजनी गावंडे यांनी दावेदारी चालू असून भारतीय जनता पक्षाकडून संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष नीळकंठ पाटील यांच्या अर्धांगिनी या वेळीही उमेदवार राहण्याचा अंदाज आहे. शिवसेना पक्षाकडून माजी शहर प्रमुख मनोहर राठोड याची अर्धिगिनी छाया राठोड,व सोयजना येथील विनोद चव्हाण यांनी आपली मानस पुत्री शिल्पा चव्हाण यांच्यासाठी दावा केला
काँग्रेस पक्षाने आपले पत्ते अध्यापही उघडले नसुन वंचित पक्षाकडूनही कुणाच्या नावाची चर्चा होताना दिसत नाही.
यावेळेस शेतकऱ्यांसाठी लढनाऱ्या मनोहर राठोड या चळवळीतील व्यक्तिमत्वाने जि.प.च्या निवडणूकीत उडी घेतल्याने ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चिन्हे आहेत. दुसरीकडे माजी आमदार प्रकाश डहाके गटाचे मानल्या जाणाऱ्या सुरेश गावंडे यांच्या अर्धांगिनी या जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती होत्या तर भाजपच्या इंदुताई पाटील ह्यांनी मागच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते खेचली होती. त्यांच्या पाठीशी आमदार राजेंद्र पाटणी यांचे भक्कम पाठबळ असुन तेही मोठ्या जोमाने कामाला लागलेले आहेत. आरक्षणानंतर वातावरण तापण्यास प्रारंभ झाला आहे.