नाट्यमय घडामोडीनंतर जिल्हा परिषद सभापती निवडणूक अविरोध

By Admin | Updated: May 9, 2015 01:49 IST2015-05-09T01:49:21+5:302015-05-09T01:49:21+5:30

कृषी व पशुसंवर्धन सभापती निवडणूक; सेना उमेदवाराची ऐनवेळी माघार.

After the dramatic developments of the Zilla Parishad elections, | नाट्यमय घडामोडीनंतर जिल्हा परिषद सभापती निवडणूक अविरोध

नाट्यमय घडामोडीनंतर जिल्हा परिषद सभापती निवडणूक अविरोध

वाशिम : मतदानाच्या दोन तासापूर्वीच्या बंदद्वार नाट्यमय घडामोडी आणि ऐनवेळी सेना उमेदवाराने माघार घेतल्याने जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापतीची निवडणूक अविरोध झाली. रिसोड तालुक्यातील रिठद सर्कलचे अपक्ष सदस्य सुभाष शिंदे यांची सभापतीपदी अविरोध वर्णी लागली आहे.
वाशिम जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक २२ डिसेंबर २0१३ मध्ये पार पडली होती. ५२ सदस्य संख्येच्या जिल्हा परिषदेत काँग्रेस १७, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना प्रत्येकी आठ, भाजप व अपक्ष प्रत्येकी सहा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चार तर भारिप-बमसं तीन असे पक्षीय बलाबल होते. विधानसभा निवडणूकदरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने मनसेचे दोन सदस्य शिवसेनेत गेले तर शिवसेनेचा एक सदस्य मनसेत दाखल झाला. जिल्हा परिषद निवडणुकीत कुठल्याच एका पक्षाला बहुमत मिळाले नसले तरी, काँग्रेस १७ जागा जिंकून सभागृहात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. त्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस, भारिप-बहुजन महासंघ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अपक्षांची मोट बांधून कॉग्रेसने जिल्हा परिषदेची सत्ता कायम राखण्यात यश मिळविले होते. काँग्रेस दोन तर राकाँ व अपक्षाला प्रत्येकी एक सभापतीपद देण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. पाच अपक्ष सदस्यांना प्रत्येकी एका वर्षासाठी सभापतीपदाचा अलिखित करारही झाला होता. त्यानुसार तत्कालिन कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमेंद्र ठाकरे यांनी अलिखित करारानुसार राजीनामा देऊन शब्द पाळला.

Web Title: After the dramatic developments of the Zilla Parishad elections,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.