शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रकाशित झाली जाहिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 12:04 IST

The advertisement was published on the last day of application : महसूल विभागाच्या या निष्काळजीपणाचा बेरोजगारांना फटका बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेसाठी तालुका, ग्राम, समूह साधन व्यक्तींमधून कंत्राटी पदासाठी एकूण ६६ पदे भरावयाची आहेत. त्यानुसार, २ ते ४ ऑगस्ट या कालावधीत मानोरा तहसील कार्यालयातील नरेगा कक्षात सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याचे पत्र तहसील कार्यालयास जुलै महिन्यातच प्राप्त झाले; मात्र अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी, ४ ऑगस्टला जाहिरात प्रकाशित करण्यात आली. महसूल विभागाच्या या निष्काळजीपणाचा बेरोजगारांना फटका बसला आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या ३० जुलै रोजीच्या पत्रानुसार तालुक्यातील तहसीलदारांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गाव पातळीवर केलेल्या कामाचे सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया २ ते २९ ऑगस्ट या कालावधीत राबवावयाची आहे. त्यासाठी कंत्राटी तत्त्वावर पदे भरण्यात येणार असून ६६ जागा भरल्या जाणार आहेत. दरम्यान, २ ते ४ ऑगस्ट या कालावधीत नरेगा कक्षात अर्ज स्वीकारावे, असे पत्र वरिष्ठांकडून तहसीलदार कार्यालयास जुलै महिन्यात पाठविण्यात आले. तालुक्यातील इच्छुक उमेदवारांना माहिती कळावी, यासाठी तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय नोटीस बोर्डवर जाहिरात लावून दवंडीद्वारे गावात प्रसिद्धी देण्यात यावी, अशा सूचना होत्या, मात्र जाहिरात विलंबाने प्रकाशित झाल्याने मूळ उद्देश असफल झाला आहे. सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया राबविण्याकरिता कंत्राटी तत्त्वावर पदे भरल्या जाणार आहेत. त्यासाठी २ ऑगस्टपूर्वीच जाहिरात प्रकाशित व्हायला हवी होती; मात्र महसूल विभागाच्या निष्काळजीपणामुळे त्यास विलंब झाला असून बेरोजगारांना फटका बसला आहे.- प्रदिप देशमुख, ग्रा.पं. सदस्य, कारखेडा

सदर जाहिरातीचे पत्र ४ ऑगस्ट रोजी दुपारी १.१३ वाजता आपणास प्राप्त झाले. साधारणतः १.४५ वाजता ते कारखेडा ग्रामपंचायत कार्यालयाकडे प्रसिद्धीसाठी दिले.- सागर चौधरी, तलाठी, कारखेडा 

टॅग्स :washimवाशिमRevenue Departmentमहसूल विभाग