प्रवेश अर्जाची मुदत संपली; प्रमाणपत्रांची पडताळणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:33 AM2021-01-15T04:33:32+5:302021-01-15T04:33:32+5:30

गत काही वर्षांपासून शिक्षक पदभरती नसल्याने शिक्षणशास्त्र पदवी व शिक्षण पदविका या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. सन ...

Admission application deadline; Verification of certificates! | प्रवेश अर्जाची मुदत संपली; प्रमाणपत्रांची पडताळणी!

प्रवेश अर्जाची मुदत संपली; प्रमाणपत्रांची पडताळणी!

Next

गत काही वर्षांपासून शिक्षक पदभरती नसल्याने शिक्षणशास्त्र पदवी व शिक्षण पदविका या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील जागा अद्यापही रिक्त आहेत. विशेष फेरीद्वारे या रिक्त जागांसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (विद्या प्राधिकरण) ११ ते १४ जानेवारीदरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले होते. प्राप्त अर्ज व प्रमाणपत्रांची पडताळणी ऑनलाइन पद्धतीने १५ जानेवारीपर्यंत केली जाणार आहे. अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना १६ जानेवारीपर्यंत स्वत:च्या ‘लॉगीन’मधून प्रवेश घ्यावयाचे अध्यापक विद्यालय निश्चित करून प्रवेशपत्र घ्यावे लागणार आहे. संबंधित अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्यांनी २० जानेवारीपर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करून स्वत:च्या ‘लॉगिन’मधून विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश द्यावा लागणार आहे.

Web Title: Admission application deadline; Verification of certificates!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.