ग्रामपंचायतचे प्रशासक झाले  नाममात्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 05:54 PM2020-11-29T17:54:25+5:302020-11-29T17:54:35+5:30

Grmapanchayat News नियुक्त करण्यात आलेले प्रशासक केवळ नावापुरतेच असल्याचे ग्रामस्थांमध्ये बाेलल्या जात आहे.

The administrator of the Gram Panchayat became nominal | ग्रामपंचायतचे प्रशासक झाले  नाममात्र 

ग्रामपंचायतचे प्रशासक झाले  नाममात्र 

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क
मानाेरा  :  मानोरा  तालुकयातील २२ ग्रामपंचायतची मुदत संपल्यामुळे त्यावर प्रशासक म्हणून शासकिय कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे. परंतु हे प्रशासक ग्रामपंचायतीला साधी भेट सुध्दा देत नाहीत, गावाच्या विकासाचा विषय तर दूरच. ग्रामपंचायतचे नियुक्त करण्यात आलेले प्रशासक केवळ नावापुरतेच असल्याचे ग्रामस्थांमध्ये बाेलल्या जात आहे.
तालुक्यातील २२ ग्रामपंचायतच्या मूदती संपल्याने पुन्हा सरपंचाना मूदतवाढ न देता ग्रामपंचायतीवर शासनाच्या आदेशान्वये प्रशासक म्हणून शासकिय कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले. यामध्ये प्रशासक म्हणून  केन्दप्रमुख , मुख्याध्यापक यांच्यासह अनेक विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे . परंतु प्रशासक नेमल्यापासून अनेक ठिकाणी गाव विकासासंदभार्त ना गावात भेटी ना एकही बैठक घेण्यात आली. प्रशासक ग्रामपंचायत सदस्यांपेक्षा चांगले कामे करतील, ते काेणत्याही पक्षाचे नसल्याने सर्वांना समान न्याय मिळेल, गावाचा विकास हाेईल असे परिसरातील गावकऱ्यांना वाटले हाेते, परंतु तसे झालेले दिसून येत नाही. प्रशासकांची नेमणुका तर करण्यात आलयात, परंतु त्यांच्याकडे असलेले इतर कामेही त्यांच्याकडे असल्याने गावविकासाकडे त्यांचे दुर्लक्ष हाेत असल्याचे गावकऱ्यांमध्ये बाेलल्या जात आहे. 
यामुळे अनेक गावाची कामे रखडली . साधी दैनंदिन कामे सुध्दा होत नाही , त्यामुळे ग्रामपंचायत अस्तित्वात आहे कि नाही  असा प्रश्न पडला आहे.  प्रशासकाने दररोज किमान दोन तास तरी  गावासाठी द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे  .
ग्रामपंचायतीची मुदत संपल्यामुळे नियुक्त करण्यात आलेले प्रशासकांकडून ग्रामस्थांना गाव विकासाची अपेक्षा हाेती, परंतु प्रशासक गावात येऊनही पाहत नसल्याने ग्रामपंचायत निवडणुकांची प्रतिक्षा ग्रामस्थ करताना दिसून येत आहेत.
 

प्रशासक व ग्रामसेवकांनी गाव विकास  व दैनंदिन कामे यासाठी नागरीकाना विश्वासात घेऊन
 कामे करणे अपेक्षीत आहे. 
- संजय भगत,  विस्तार अधिकारी (पंचायत ) मानोरा

Web Title: The administrator of the Gram Panchayat became nominal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.