वैयक्तिक लाभाच्या योजनेकडे प्रशासनाचा कानाडोळा
By Admin | Updated: September 12, 2014 22:59 IST2014-09-12T22:59:57+5:302014-09-12T22:59:57+5:30
वाशिम पंचायत समिती प्रशासनाने वैयक्तिक लाभाच्या योजणाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

वैयक्तिक लाभाच्या योजनेकडे प्रशासनाचा कानाडोळा
वाशिम: वैयक्तिक शौचालय, गुरांचा गोठा, शेळी पालन शेड कुकूट पालन शेड, शौच खड्डे इत्यादी वैयक्तिक लाभाच्या योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत समाविष्ठ असताना वाशिम पंचायत समिती प्रशासनाने वैयक्तिक लाभाच्या योजणाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. दूसरीकडे सार्वजनिक कामे म्हणजे अंतर्गत रस्ते, सिमेंट प्लग, पांदन रस्ते, गाळ काढणे, सिंचन विहीरी इत्यादी प्रकारे कामे जि.प. व पं.स. सदस्यांच्या र्मजितील गावामध्ये कोटयावधीचे कामे सुरू केलीत. परंतु वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये कुठलेही अर्थकारण घडत नाही म्हणून ही कामे ठप्प ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. या वैयक्तिक लाभाच्या योजणा त्वरित राबवा व याचा लाभ गरजूंना तळागाळातील गरीब जनतेला होउ दया, अशी मागणी भारीप बहुजन महासंघाकडून केली आहे.