पाणीटंचाईसदृश परिस्थितीवर प्रशासनाची नजर

By Admin | Updated: March 18, 2015 01:54 IST2015-03-18T01:54:55+5:302015-03-18T01:54:55+5:30

वाशिम जिल्ह्यातील बहुतांश कामे पूर्ण; सहा गावांना विहिरीवरून पाणीपुरवठा सुरू.

The administration looked at the situation of scarcity | पाणीटंचाईसदृश परिस्थितीवर प्रशासनाची नजर

पाणीटंचाईसदृश परिस्थितीवर प्रशासनाची नजर

वाशिम : जिल्हय़ात गतवर्षी झालेल्या अपुर्‍या पर्जन्यमानामुळे उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने सन २0१४-१५ या उन्हाळय़ाकरिता एकूण ४३९ गावांकरिता ६0१ विविध उपाय योजनांचा ५४७. ९८ लक्षच्या टंचाई कृती आराखड्यास मंजुरी प्रदान केली आहे. या मंजुरीनुसार विविध उपाय योजनांकरिता आवश्यक मंजुरी घेऊन अनेक कामांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नवीन विंधन विहिरींची कामे पुर्णत्वास तर जिल्हय़ातील सहा गावांकरिता आठ खासगी विहिरी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यासह विविध कामेही पूर्ण तर काही पुर्णत्वाकडे आहेत.
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रस्तावित सर्व गावांचे व स्थळ निश्‍चितीची कामे पूर्ण झाली असून, ५१ नवीन विंधन विहिरींपैकी जवळपास कामे पूर्ण झाली आहेत. नळ योजना दुरूस् तीची कामे प्रगतीपथावर असून, बहुतांश कामे झाली आहेत. सद्यस्थितीत एकाही गावात भीषण पाणीटंचाईस सामोरे जाण्याची वेळ आली नसल्याने टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्या त आलेला नाही. मंजूर आराखड्यातील प्रस्तावित ९३ गावातील ९५ टँकरपैकी सद्यस्थितीत एकही टँकर लावण्याची अद्याप आवश्यकता पडली नसल्याने ते लावण्यात आलेले नाहीत. खासगी विहिरीचे अधिग्रहण करणे अंतर्गत सहा गावाकरिता आठ विहिरीवरून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून, यामध्ये वाशिम व कारंजा तालुक्यातील प्रत्येक तीन गावांचा समावेश आहे. जिल्हय़ातील सहाही तालुक्यांमध्ये नवीन विंधन विहिरी खोदकामे पूर्ण झाली, त्यामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील नऊ, मालेगाव सात, रिसोड ११, मानोरा सहा, कारंजा दोन व वाशिम तालुक्यातील तीन गावांतील विहिरींचा समावेश आहे. जिल्हय़ातील एकूण नऊ प्रादेशिक नळ योजनांचा समावेश नळ योजना विशेष दुरूस्तीस या उपाय योजनेत करण्यात आला. मंजूर आराखड्यातील प्रस्तावित १0८ गावातील १0९ विहीर खोलीकरणपैकी सर्व गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, अंदाजपत्रकीय प्रस्ताव मंजुरीस सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: The administration looked at the situation of scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.