मालेगाव शहरात नियमांचे पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:28 IST2021-07-10T04:28:39+5:302021-07-10T04:28:39+5:30
............... पाच कोटींवर विद्युत थकबाकी वाशिम : शहरातील विद्युत ग्राहकांकडे देयकांची पाच कोटींपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे. ती वसूल ...

मालेगाव शहरात नियमांचे पालन
...............
पाच कोटींवर विद्युत थकबाकी
वाशिम : शहरातील विद्युत ग्राहकांकडे देयकांची पाच कोटींपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे. ती वसूल करण्याची मोहीम गेल्या काही दिवसांपासून महावितरणने हाती घेतली असून, त्यास प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी दिली.
....................
मास्कचा वापर करण्याचे आवाहन
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र, संकट पूर्णत: निवळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी तोंडाला सदोदित मास्कचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.मधुकर राठोड यांनी केले.
..............
साैरऊर्जा वापराकडे दुर्लक्ष
वाशिम : अपारंपरिक ऊर्जास्रोत वापरास चालना देण्यात यावी, अशा शासनाच्या सूचना आहेत. प्रत्यक्षात मात्र प्रशासकीय कार्यालयांनीच साैरऊर्जा वापराकडे दुर्लक्ष केले असून, हे अभियान बहुतांशी थंडावले आहे.
...................
सापाला न मारता संपर्क साधण्याचे आवाहन
वाशिम : सध्या पावसाळ्याचे दिवस असून, विविध प्रजातींचे साप आढळत आहेत. साप हा शत्रू नसून मित्र आहे. त्यामुळे त्यास जीवे न मारता आपणास संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्र मो.समीर यांनी केले आहे.