कृषी सेवा केंद्रांवर नियमांचे पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:30 IST2021-05-29T04:30:16+5:302021-05-29T04:30:16+5:30
................ रस्ता कामामुळे वाहतुकीस अडथळा वाशिम : पाटणी चाैक ते अकोला नाका यादरम्यानच्या रस्त्याचे काम सध्या सुरू असून, यामुळे ...

कृषी सेवा केंद्रांवर नियमांचे पालन
................
रस्ता कामामुळे वाहतुकीस अडथळा
वाशिम : पाटणी चाैक ते अकोला नाका यादरम्यानच्या रस्त्याचे काम सध्या सुरू असून, यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पर्यायी रस्त्याने गर्दी वाढली आहे.
...............
पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन ही व्यवस्था उभारण्याची मागणी होत आहे.
...............
पाण्याचा वापर काटकसरीने करा
वाशिम : एकबुर्जी प्रकल्पाची पाणीपातळी तुलनेने घटली आहे. यामुळे आगामी काही दिवस नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी केले आहे.
.............
दिव्यांग बांधवांना अन्नधान्याची मदत
वाशिम : कोरोना महामारीमुळे सर्वत्र सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे सर्वच जण त्रस्त झाले आहेत. हातावर पोट भरणाऱ्यांची उपासमार होत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केकतउमरा येथील चेतन सेवांकुर ऑर्केस्ट्रातील दिव्यांग बालकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
.................
व्यापाऱ्यांनी चाचणी करण्याचे आवाहन
वाशिम : शहर परिसरातील व्यापाऱ्यांनी व त्यांच्या दुकानांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांनी स्वत:हून कोरोना चाचणी करून घ्यावी. नियमांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार विजय साळवे यांनी केले आहे.
...............
रस्त्यावरील हातपंप काढण्याची मागणी
वाशिम : स्थानिक पाटणी कमर्शियल काॅम्प्लेक्ससमोरच्या मुख्य रस्त्याला लागूनच जुना हातपंप अद्याप कायम आहे. पाणी उपलब्ध नसलेला हा हातपंप काढून घ्यावा, अशी मागणी होत आहे.
..............
रस्ता दुरुस्तीचा प्रश्न ‘जैसे थे’
वाशिम : शहरातील पोस्ट ऑफीस चाैकापासून सिव्हिल लाईनकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दुरुस्तीची मागणी वेळोवेळी करण्यात आली. मात्र हा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’ असल्याचे दिसून येत आहे.
...................
मोकाट श्वानांमुळे नागरिक त्रस्त
वाशिम : शहरातील काही भागात विशेषत: रात्रीच्या सुमारास मोकाट श्वान अंगावर धावून येण्याचा प्रकार बळावला आहे. यामुळे वाहनचालक नागरिक त्रस्त झाले असून, न.प.ने या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
...............
मनोरुग्ण भिकाऱ्यांवर उपासमारीची वेळ
वाशिम : कोरोनाच्या संकटामुळे हाॅटेल्स, पावभाजी, पाणीपुरी विक्रीच्या गाड्या बंद राहत आहेत. यामुळे उरणाऱ्या अन्नावर उपजीविका भागत असलेल्या मनोरुग्ण भिकाऱ्यांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.
................
शिवरायांच्या पुतळ्यास जलाभिषेक
वाशिम : स्थानिक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास वर्षभर जलाभिषेक करण्याचा संकल्प शहरातील काही युवकांनी घेतला आहे. त्यानुसार, शुक्रवारी सकाळच्या सुमारास हा उपक्रम राबविण्यात आला.