शहरं
Join us  
Trending Stories
1
एक्झिट पोलवर सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया! जाणून घ्या, काय म्हणाल्या?
2
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
3
शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस
4
Fact Check : राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होतील असा दावा करणारी शाहरुख खानची 'ती' पोस्ट खोटी
5
अंध:कार दूर होणार, मोदी जाणार, भाजपा २२५ वर अडणार, तर इंडिया आघाडी..., सामनाचा दावा
6
T20 WC 2024 : पोलार्ड इंग्लंडच्या ताफ्यात! गतविजेत्यांना पुन्हा एकदा चॅम्पियन करण्यासाठी मैदानात
7
Anil Ambaniच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी; रिलायन्स पॉवर, इन्फ्रामध्ये जोरदार वाढ; जाणून घ्या?
8
Gold Price Today: ३ जून रोजी स्वस्त झालं Gold, निवडणुकांच्या निकालापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण
9
“NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज”; शिंदे गटाचा दावा
10
OMA vs NAM : नामिबियाचा 'सुपर' विजय! ओमानची कडवी झुंज; केवळ ११० धावा पण सामना गाजला
11
“थोरातांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते, स्वतःला नेते समजतात पण...”: राधाकृष्ण विखे पाटील
12
रवीना टंडनवर झालेल्या खोट्या आरोपांवर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, "ही धोक्याची घंटा..."
13
Exit Poll सुद्धा 'कन्फ्युज'! महाराष्ट्राचा नेमका कौल असणार तरी काय?
14
आरोग्य सांभाळा! जास्त तहान लागत असेल तर सावधान; 'या' ५ आजारांचा वाढू शकतो धोका
15
अल्लाह तुमच्या सर्व समस्या जाणून आहे, त्यामुळे संयम ठेवा; Sania Mirza ची पोस्ट
16
Share Market : शेअर बाजाराला 'एक्झिट पोल'चा बूस्टर; सेन्सेक्समध्ये २६०० अंकांपेक्षा अधिक तेजी
17
"EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील"
18
NAM vs OMA : WHAT A MATCH! ओमानने नामिबियाच्या तोंडचा घास पळवला, Super Over मध्ये निकाल
19
अनेक वर्षे होती सत्ता, पण या राज्यात काँग्रेसला उमेदवार मिळेनात, ४१ जागांवर केलं सरेंडर
20
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी

पटपडताळणीत अडकणार विद्यार्थ्यांचे जादा प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 4:27 PM

पटपडताळणीदरम्यान जादा प्रवेश रद्द होणार असल्याने, महाविद्यालयांच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांना भोगावी लागण्याची भीती वर्तविली जात आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : इयत्ता अकरावीतील प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून, काही कनिष्ठ महाविद्यालयात क्षमतेपेक्षा जादा प्रवेश दिले जात आहेत. पटपडताळणीदरम्यान जादा प्रवेश रद्द होणार असल्याने, महाविद्यालयांच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांना भोगावी लागण्याची भीती वर्तविली जात आहे.यावर्षी इयत्ता दहावीचे एकूण १५ हजार १३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत जिल्ह्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण २१ हजार ८४० जागा उपलब्ध आहेत. जिल्ह्यात अनुदानित ८०, विना अनुदानित ६१, कायम विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित २६ अशा एकूण १६७ कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी संख्येनुसार अकरावीच्या २७३ तुकड्या आहेत. यामध्ये अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाच्या १११ वर्गतुकडीत ८८८० जागा, विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाच्या  ११२ वर्गतुकडीत ८९६० जागा, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयाच्या ५० वर्गतुकडीत चार हजार जागा उपलब्ध आहेत. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला २२ जूनपासून सुरूवात झाली असून, १३ जुलैपर्यंत प्रवेश दिले जाणार आहेत. केंद्रीय प्रवेश पद्धतीला फाटा देत जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वंयअर्थसहाय्यित उच्च माधमिक, कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर राबविली जात आहे. काही विशिष्ट कनिष्ठ महाविद्यालयांना पसंती दिली जात असल्याने तेथे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. प्रत्येक शाखेतील विद्यार्थी प्रवेश क्षमता निश्चित केली असून, त्यानुसारच कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश द्यावे, असे निर्देश माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने यापूर्वीच दिले आहेत. तथापि, शिक्षण विभागाचे निर्देश झुगारून काही कनिष्ठ महाविद्यालयांनी जादा प्रवेश दिले आहेत. यासंदर्भात शिक्षणाधिकारी कार्यालयाकडेदेखील तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने पटपडताळणी केली जाणार असून, क्षमतेपेक्षा जादा प्रवेश आढळून आल्यास सदर प्रवेश मान्य केले जाणार नाहीत, असे शिक्षणाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले. कनिष्ठ महाविद्यालयांच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती वर्तविली जात आहे. दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत जिल्ह्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी जवळपास सहा हजार अधिक जागा उपलब्ध आहेत. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये अशा सूचना मुख्याध्यापक, प्राचार्यांना दिलेल्या आहेत. पटपडताळणीदरम्यान क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश मान्य केले जाणार नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी घ्यावी तसेच विद्यार्थी व पालकांनीदेखील विशिष्ट कनिष्ठ महाविद्यालयाचा हट्ट न धरता जेथे रिक्त जागा आहेत, तेथे प्रवेश घ्यावे.- टी.ए. नरळेशिक्षणाधिकारी (माध्यमिक) वाशिम

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी