नियम उल्लंघनप्रकरणी वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST2021-03-18T04:41:35+5:302021-03-18T04:41:35+5:30
------------------- महामार्गावर रात्रीला ढाबे सुरूच वाशिम : कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच प्रतिष्ठाने सुरू ठेवण्याची मुुभा असताना महामार्गावर ...

नियम उल्लंघनप्रकरणी वाहनांवर कारवाई
-------------------
महामार्गावर रात्रीला ढाबे सुरूच
वाशिम : कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच प्रतिष्ठाने सुरू ठेवण्याची मुुभा असताना महामार्गावर रात्री उशिरापर्यंत ढाबे सुरूच राहत असून, या ठिकाणी वाहनचालकांसह क्लिनर मंडळी आणि प्रवाशांची गर्दी होत असल्याचे मंगळवारी रात्री दिसले.
-------------------
वाशिम तालुक्यातील जिल्हा सीमा मोकाट
वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असताना परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांसह वाहनचालकांची जिल्हा सीमांवर तपासणी आवश्यक आहे; परंतु वाशिम तालुक्यातील जिल्ह्याच्या सीमेवर मात्र अशी कोणतीच व्यवस्था नसल्याचे दिसत आहे.
-------------------
खासगी लसीकरणाला अल्प प्रतिसाद
वाशिम : शासनाने शासकीय दवाखान्यात ज्येष्ठ नागरिक आणि दुर्धर आजारग्रस्तांना मोफत कोरोना लस उपलब्ध करून दिल्याने खासगी दवाखान्यात २५० रुपये खर्च करून लस घेण्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसून, गत १५ दिवसांत केवळ १३०० लोकांनी खासगी दवाखान्यात लस घेतली आहे.