‘त्या’ २५ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST2021-02-05T09:27:49+5:302021-02-05T09:27:49+5:30
........... याेगाश्रमात विविध कार्यक्रम कारंजा : श्री सिद्ध गोरक्षनाथ महाराज यांची तिसरी पुण्यतिथीनिमित्त नाथ ...

‘त्या’ २५ वाहनांवर कारवाई
...........
याेगाश्रमात विविध कार्यक्रम
कारंजा : श्री सिद्ध गोरक्षनाथ महाराज यांची तिसरी पुण्यतिथीनिमित्त नाथ योगाश्रम, रामगाव रामेश्वर येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले . यानिमित्त नवनाथ पारायण, गुरू गीता वाचन, कार्यक्रम पार पडले. यावेळी भाविकांनी काेराेना नियमांचे पालन केले.
.............
कृषीपंप जोडणी रखडली
केनवड : केनवड जिल्हा परिषद गटातील जवळपास ५६ शेतकऱ्यांची कृषीपंप जोडणी रखडली आहे. यामुळे सिंचन करण्यापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे . महावितरणाने कृषीपंप जोडणीचा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याची मागणी महादेवराव ठाकरे यांनी २९ डिसेंबर रोजी केली.
.................
नादुरूस्त कॅनॉलमुळे पाण्याचा अपव्यय
अनसिंग : रब्बी हंगामातील पिकांसाठी सिंचन प्रकल्पामधील पाणी कालव्यांद्वारे सोडले जात आहे; मात्र काही ठिकाणचे कालवे नादुरुस्त झाले असून, पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे . जलसंपदा विभागाने याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.