बाहेरून बंद, आतून सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:31 IST2021-05-30T04:31:16+5:302021-05-30T04:31:16+5:30
वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आलेल्या पथकातर्फे दुकानांची झाडाझडती घेण्यात येत आहे. मुख्याधिकारी दीपक माेरे यांनी पथकाला ...

बाहेरून बंद, आतून सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई
वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आलेल्या पथकातर्फे दुकानांची झाडाझडती घेण्यात येत आहे. मुख्याधिकारी दीपक माेरे यांनी पथकाला काेराेना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची हयगय न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नियुक्त करण्यात आलेले पथक किशोर हडपकर, रमेश झामरे, उज्वल देशमुख विशेषत्: सकाळी ७ ते ११ च्यादरम्यान परवानगी नसलेल्या दुकानांची पाहणी करीत आहेत. दुकाने उघडी असणाऱ्यांकडून दंड आकारण्यात येत आहे. तसेच काेराेना संसर्ग पाहता, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर केला जाताे की नाही, यावरही पथकातर्फे वाॅच ठेवण्यात येत आहे. कपड्यांची दुकाने, मोबाईल विक्री व दुरुस्तीची दुकाने, हार्डवेअर यासह इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे प्रशासनाचे स्पष्ट निर्देश असताना काही दुकाने उघडी दिसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच काेराेना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
..................
काेराेना संसर्ग पाहता अत्यावश्यक सेवेत माेडणाऱ्या दुकानदारांनीच वेळेत आपली दुकाने उघडावित. इतर दुकाने उघडी दिसून आल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापनाच्या धाेरणानुसार कारवाई करण्यात येणार आहे. दुकानदारांनी काेराेना संसर्ग पाहता, प्रशासनास सहकार्य करावे.
- दीपक माेरे,
मुख्याधिकारी, नगरपरिषद, वाशिम