गौण खनिज उत्खननप्रकरणी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:37 IST2021-07-26T04:37:41+5:302021-07-26T04:37:41+5:30
पीएसआय संतोष आघाव यांनी पोलीस ठाण्यात नोंद केली की, २४ जुलै रोजी गुन्ह्याच्या तपासकामी कर्मचाऱ्यांसह वनोजा येथे जात असताना ...

गौण खनिज उत्खननप्रकरणी कारवाई
पीएसआय संतोष आघाव यांनी पोलीस ठाण्यात नोंद केली की, २४ जुलै रोजी गुन्ह्याच्या तपासकामी कर्मचाऱ्यांसह वनोजा येथे जात असताना उजव्या दिशेला ५.३० वाजेदरम्यान जेसीबीने ट्रॅक्टरमध्ये (एमएच ३७ एल ९४२६ क्रमांकाचा जेसीबी व एमएच ३७ एल ८४७३ चे ट्रॅक्टर) मुरूम भरताना दिसून आले. जेसीबी चालक कैलास देवराव शिंदे, रा. भूर व ट्रॅक्टर चालक योगेश प्रताप इंगळे (२५), रा. भूर, अशी चालकांची नावे आहेत. रॉयल्टी परवान्याबाबत चालकांस विचारणा केली असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. नियमानुसार आवश्यक ती कागदपत्रे आढळून न आल्याने ट्रॅक्टर व जेसीबी पोलीस स्टेशनला आणण्यात आले. पुढील कार्यवाहीबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वाशिम, तसेच तहसीलदार मंगरूळपीर यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला.