शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
2
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
3
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
4
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
6
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
7
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
8
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
9
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
10
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
11
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
12
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
13
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
14
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
15
बांगलादेशी खासदाराला अडकविले हाेते हनी ट्रॅपमध्ये; हत्येसाठी मित्रानेच दिली ५ कोटींची सुपारी
16
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
17
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
18
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
19
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
20
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य

अपघात कमी करण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लान’!   - जयश्री दुतोंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 5:29 PM

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया स्कुल बस नियमावली व अन्य महत्वाच्या विषयांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्याशी साधलेला संवाद... 

लोकमत न्यूज नेटवर्कसर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने रस्त्यांवरील घटनांमध्ये होणारे वाहनांचे अपघात आणि त्यामध्ये होणाºया मृत्यूंच्या प्रमाणात दरवर्षी किमान १० टक्के घट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहन चालकांविरूद्ध धडक कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. याबाबत तसेच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया स्कुल बस नियमावली व अन्य महत्वाच्या विषयांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्याशी साधलेला संवाद... 

रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी नेमके काय करता येईल? दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहतूक करणाºया सर्व प्रकारच्या वाहनांना सुरक्षित वाहतूकीसंदर्भातील नियम घालून देण्यात आले आहेत. त्याचे तंतोतंत पालन झाल्यास निश्चितपणे अपघातांचे प्रमाण कमी करणे शक्य आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशासंबंधी काय सांगाल?रस्त्यांवरील प्राणंतिक अपघातांचे प्रमाण १० टक्क्याने कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने रस्ता सुरक्षा समिती गठीत केली आहे. या समितीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहन चालकांविरूद्ध एकूण १५ गुन्ह्यांसाठी कारवाईचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सक्रीय झाली असून दैनंदिन कारवायांचे सत्र हाती घेण्यात आले आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीत कसूर झाल्यास संबंधित अधिकाºयांविरूद्ध देखील कारवाई केली जाणार आहे.

गतवर्षीच्या कारवायांची स्थिती काय होती? गतवर्षी एकूण २० प्रकारात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १९४२ कारवाया करण्यात आल्या. यामाध्यमातून २८ लाख ६२ हजार ५५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

स्कुल बसेसच्या नियमावलीची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे का? उच्च न्यायालयाच्या ७ एप्रिल २०१६ च्या आदेशानुसार स्कुल बस म्हणून नोंदणी झालेली वाहने सुरक्षाविषयक तरतूदी व नियमावलीची अंमलबजावणी करतात किंवा नाही, याची ३१ मेपर्यंत विशेष शिबिरांच्या माध्यमातून फेरतपासणी करण्यात आली. त्यास बºयापैकी प्रतिसाद मिळाला आहे; परंतु या मोहिमेस प्रतिसाद न दिलेल्या स्कुल बसेसचे परवाने निलंबित करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसwashimवाशिम