शहरातील मुख्य रस्त्यात उभ्या असलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:42 IST2021-03-17T04:42:27+5:302021-03-17T04:42:27+5:30

काेराेनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याकरिता प्रशासनाकडून काेराेना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तरीसुद्धा काही नागरिक, लघुव्यावसायिक ...

Action on peddlers standing in the main streets of the city | शहरातील मुख्य रस्त्यात उभ्या असलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई

शहरातील मुख्य रस्त्यात उभ्या असलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई

काेराेनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याकरिता प्रशासनाकडून काेराेना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तरीसुद्धा काही नागरिक, लघुव्यावसायिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पाेलीस विभागातर्फे कारवाईची माेहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील अकाेला रस्ता, अकाेला नाका, पाेस्ट ऑफिस चाैक, पुसद नाका, रिसाेड नाक्यासह शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पाेलीस कर्मचारी उभे राहून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, काेराेना नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नागेश माेहाेड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी करीत आहेत.

....................

पाेलीस येताच फेरीवाल्यांची धावपळ

वाशिम शहरातील रस्त्यांवर लघुव्यावसायिक बसून वाहतूक प्रभावित करीत असल्याने शहर वाहतूक शाखेच्यावतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. पाेलीस येतात फेरीवाले वाटेल त्या मार्गाने धावपळ करीत असल्याचे चित्र वाशिम शहरात दिसून येत आहे. पाेलिसांचे वाहन दिसल्याबराेबर फेरीवाले रस्त्यावर चालताना दिसून येत आहेत.

Web Title: Action on peddlers standing in the main streets of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.