जुगारप्रकरणी कारवाई
By Admin | Updated: February 2, 2015 23:59 IST2015-02-02T23:59:42+5:302015-02-02T23:59:42+5:30
शिरपूर जैन येथे स्थानिक गुन्हे शाखेची १५ जुगा-यांवर कारवाई.

जुगारप्रकरणी कारवाई
शिरपूरज जैन (जि. वाशिम): ५२ तासपत्त्याचा जुगार खेळणार्या १५ आरोपीविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केल्याची घटना १ फेब्रुवारी रोजी पिंप्री सरहद शेत शिवारात घडली.
पिंप्री सरहद परिसरात ५२ तासपत्यांचा जुगार सुरु असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारावरुन पिंप्री सरहद शेत शिवारात धाड टाकण्यात आली. यावेळी १५ आरोपी जुगार खेळतांना रंगेहात पकडले. या आरोपींकडून रोख २६ हजार १६0 रुपये जप्त करण्यात आले. सदर कारवाई पोलिस उपनिरिक्षक डी. डी. डाखोरे, जायभाये, आर. एस. गुरे, यांच्या पथकाने केली आहे. मुंबई जुगार अँक्ट नूसार १५ आरोपीविरुध्द गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.