अनसिंग परिसरात चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:37 IST2021-03-22T04:37:28+5:302021-03-22T04:37:28+5:30

वाशिम : वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या चमूने अनसिंग रस्त्यावर गत दोन दिवसांत दंडात्मक कारवाई ...

Action on drivers in Ansing area | अनसिंग परिसरात चालकांवर कारवाई

अनसिंग परिसरात चालकांवर कारवाई

वाशिम : वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या चमूने अनसिंग रस्त्यावर गत दोन दिवसांत दंडात्मक कारवाई केली. मास्कचा वापर न करणे, तिबलसीट आदीप्रकरणी ही कारवाई केली.

रिसोड येथे आरोग्य तपासणी

वाशिम : रिसोड शहरात माेठ्या प्रमाणात काेराेना बाधित वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांची काेराेना तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

केनवड येथे कृत्रिम पाणीटंचाई

वाशिम : केनवड जिल्हा परिषद गटातील काही गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसून गावकऱ्यांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

ताेंडगाव येथे वातावरणात बदल

वाशिम : गत तीन - चार दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत असल्याने नागरिकांनी आरोग्य सांभाळावे, असे सल्ला आरोग्य विभागाने दिला. जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने सर्दीच्या रुग्णात वाढ हाेण्याची शक्यता आहे.

Web Title: Action on drivers in Ansing area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.