शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:42 IST2021-03-27T04:42:36+5:302021-03-27T04:42:36+5:30
पोलीस पाटलाचे पद रिक्त वाशिम : मालेगाव तालुक्यातील ग्राम वरदरी बु. येथील पोलीस पाटील पद गत सहा वर्षांपासून रिक्त ...

शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाई
पोलीस पाटलाचे पद रिक्त
वाशिम : मालेगाव तालुक्यातील ग्राम वरदरी बु. येथील पोलीस पाटील पद गत सहा वर्षांपासून रिक्त आहे. पोलीस पाटलाचे पदभरतीसाठी उमेदवाराच्या नावावर शेती असावी ही जाचक अट रद्द करावी आणि पोलीस पाटलाचे पद त्वरीत भरण्याची मागणी केली जात आहे.
महावितरणतर्फे वीज चाेरांवर कारवाई
वाशिम : विविध प्रकारे वीजचोरी करून महावितरणला कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या वीज चोरट्यांविरोधात महावितरणकडून कारवाईची मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत जिल्ह्यात दहा लाखांची वीजचोरी पकडण्यात आली हाेती.
मास्क प्रकरणी ३८ चालकांवर कारवाई
वाशिम : वाहन चालविताना मास्कचा वापर करण्याच्या सूचना असतानाही अनेकजण याकडे दुर्लक्ष करीत आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मास्कचा वापर न करणाऱ्या ३८ चालकांवर कारवाई केली.