मास्कचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांविरूद्ध कारवाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 04:52 PM2020-09-12T16:52:21+5:302020-09-12T16:52:29+5:30

नगर परिषद, पोलीस विभागाने १२ सप्टेंबरपासून कारवाईची मोहिम हाती घेतली असून, जवळपास ३० जणांवर दंडात्मक कारवाई केली.

Action against two-wheelers who do not wear masks! | मास्कचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांविरूद्ध कारवाई !

मास्कचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांविरूद्ध कारवाई !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत रिसोड शहरात अनेकजण विनामास्क दुचाकीवर फिरतात. या पृष्ठभूमीवर नगर परिषद, पोलीस विभागाने १२ सप्टेंबरपासून कारवाईची मोहिम हाती घेतली असून, जवळपास ३० जणांवर दंडात्मक कारवाई केली.
रिसोड शहरात सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोेडण्यासाठी मध्यंतरी बाजारपेठही बंद ठेवत जनता कर्फ्यू पाळण्यात आला. परंतू, कोरोनाची संख्या नियंत्रणात आली नाही. एकिकडे कोरोना संसर्ग वाढत असताना दुसरीकडे अनेकजण विनामास्क दुचाकीवर फिरतात. बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही होत नाही. अनेक भाजी व फळविक्रेतेही मास्कचा वापर करीत नाहीत. मास्क, रुमालचा वापर न करणाऱ्यांंविरूद्ध नगर परिषद, पोलीस विभागाने कारवाईची मोहिम सुरू केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते लोणी फाटा या दरम्यान जवळपास ३० जणांवर दंडात्मक कारवाई केली. यापुढेही चेहº्यावर मास्क न बांधता शहरात, सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाº्या नागरिकांकडून एकरकमी ५०० रुपये दंड वसूल केला जाणार आहे तसेच एकाच नागरिकावर एकापेक्षा जास्त वेळा दंडाची रक्कम आकारण्यात आल्यास, अशा नागरिकाला शहरामध्ये फिरण्यास मज्जाव करून त्याच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही नगर परिषद, पोलीस प्रशासनाने दिला.

Web Title: Action against two-wheelers who do not wear masks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.