नियमांचे उल्लंघनप्रकरणी सहा दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:30 IST2021-05-29T04:30:20+5:302021-05-29T04:30:20+5:30
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने ९ मेपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. २० मेपासून त्यात अंशत: शिथिलता ...

नियमांचे उल्लंघनप्रकरणी सहा दुकानांवर कारवाई
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने ९ मेपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. २० मेपासून त्यात अंशत: शिथिलता देत सकाळी ७ ते ११ या चार तासांच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली; मात्र दुकानदारांनी व खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या; मात्र काही दुकानांमध्ये नियमांचे उल्लंघन करणे सुरूच आहे. दरम्यान, २८ मे रोजी नगर परिषदेच्या पथकाने शहरातील श्रीधर रेडिमेड, शर्मा ऑटोमोबाईल्स, फॅन्सी केक शाॅप, परिवार कलेक्शन, सानिका साडी सेंटर, आशापुरी पाॅलिबॅग हाऊस आदी ठिकाणी धडक देऊन पाहणी केली असता काही दुकानदारांनी व कर्मचाऱ्यांनी आरटी-पीसीआर टेस्ट केली नसल्याचे आढळले. याशिवाय सोशल डिस्टन्सिंग व तोंडाला मास्क लावण्याचा नियमही पाळला नाही. यावरून संबंधित दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नगर परिषदेच्या पथकामध्ये किशोर हडपकर, रमेश झामरे, उज्ज्वल देशमुख यांचा समावेश होता. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.