जुगारप्रकरणी चौघांविरुद्ध कारवाई
By Admin | Updated: June 6, 2016 01:58 IST2016-06-06T01:58:32+5:302016-06-06T01:58:32+5:30
वाशिम येथील परशुराम भवन परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

जुगारप्रकरणी चौघांविरुद्ध कारवाई
वाशिम : येथील परशुराम भवन परिसरात सुरू असलेल्या जुगारअड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यामध्ये उत्तम बालाजी खडसे, संजय नामदेव भगत (दोघेही रा. शुक्रवार पेठ), नजीर रशीद नंदावाले (रा. मोहगव्हाण), शफीक खान जावेद खान (रा. वाशिम) यांच्याकडून ५२ ताश पत्ते व रोख ४८४0 रुपये जप्त केले. या चौघांविरुद्ध वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.