शहरं
Join us  
Trending Stories
1
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
2
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
3
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
4
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
5
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
6
अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक
7
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?
8
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
9
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
10
WI vs PNG : हलक्यात घेऊन चालणार नाही! नवख्या संघानं वेस्ट इंडिजला घाम फोडला, कसाबसा सामना जिंकला
11
पंचग्रही योग: ‘या’ ५ मूलांकांना सुख-समृद्धी काळ, धनलाभाची संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ होईल!
12
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
13
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण
14
जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी
15
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
16
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 
17
नव्या उच्चांकासाठी बाजार सज्ज, एक्झिट पोलमधून देशात स्थिर सरकारचे येण्याचे संकेत
18
अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
19
प्रवासकोंडीचे ग्रहण सुटले, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉकला पूर्णविराम
20
एआय एक्झिट पोलमध्येही 'कमळ'; पण इंडियाच्याही जागा वाढणार

२१ दिवसांत तीन हजार वाहनचालकांवर कारवाई  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 5:32 PM

Washim traffic police : वाहतूक शाखेने वाहतूक नियमांना वाकुल्या दाखविणाºया जवळपास तीन हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली.

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ एप्रिलपासून संचारबंदीचे सुधारीत आदेश लागू असून, १५ एप्रिल ते ५ मे या २१ दिवसांत वाशिम शहर वाहतूक शाखेने वाहतूक नियमांना वाकुल्या दाखविणाºया जवळपास तीन हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. लॉकडाऊनमुळे मास्कच्या कारवायांमध्ये घट असली तरी तिबल सीटचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली असून, या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाहतूक नियमांचे पालन तसेच चालकांनी मास्कचा वापर करावा, असे निर्देश आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी वाहतूक नियम न पाळणाºयांविरूद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वाशिम शहरात वाहतूक नियम न पाळणाºयांविरूद्ध कारवाई केली जात आहे. गत २१ दिवसांत जवळपास ३१०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये विनानंबर, फॅन्सी नंबर प्लेट, लायसन्स नसणे, मास्क नसणे, तिबल सीट तसेच कोणतेही कारण नसताना विनाकारण फिरणे आदी कारणांचा समावेश आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा, भाजीपाला यासह अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू असतात. या दरम्यान वाहतुकीची वर्दळ असून, नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई केली जाते. दुपारनंतर शुकशुकाट राहत असल्याने मास्कच्या कारवायांमध्ये घट आल्याचे शहर वाहतूक शाखेने स्पष्ट केले. तिबल सीटच्या कारवायांमध्ये वाढ झाल्याचेही दिसून येते. २१ दिवसांत जवळपास २२० चालकांवर मास्कचा वापर न केल्याप्रकरणी कारवाई केली. जवळपास ५०० जणांवर तिबल सीटप्रकरणी कारवाई करण्यात आली. वाहनचालकांनी कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून वाहतूक नियमाचे पालन करावे,  असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे प्रमुख नागेश मोहोड यांनी केले.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसwashimवाशिम