खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:37 IST2021-04-26T04:37:29+5:302021-04-26T04:37:29+5:30
चिवरा येथील मृत संजय मुठाळ (४२) याच्यासोबत अमोल चव्हाण व अविनाश डांगे दोघेही रा. शिरपूर यांचा क्षुल्लक कारणावरून वाद ...

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक
चिवरा येथील मृत संजय मुठाळ (४२) याच्यासोबत अमोल चव्हाण व अविनाश डांगे दोघेही रा. शिरपूर यांचा क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन आरोपी अमोल चव्हाण व अविनाश डांगे यांनी संजय मुठाळ यास जबर मारहाण केल्याने यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तेव्हापासून या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार आहेत. दोन्ही आरोपींचा सर्वत्र शोध घेतला असता ते मिळून आले नाही. २४ एप्रिल रोजी अमोल रमेश चव्हाण हा खालापूर (जि. रायगड) परिसरात असल्याबाबत खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्याने तात्काळ पो.स्टे. मालेगाव येथील पोलीस उपनिरीक्षक आकाश महल्ले, नापोकॉ गजानन झगरे, नापोको बबलू खान व पोकॉ अमोल पाटील यांचे पथक खालापूर जि. रायगड येथे पाठविण्यात आले. आरोपी हा एका विश्रामगृहात वास्तव्य करीत असताना मिळून आला. पथकाने अमोल चव्हाण यास ताब्यात घेत २५ एप्रिल रोजी मालेगाव येथे आणले. ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार आधारसिंग सोनोने, पोलीस उपनिरीक्षक आकाश महल्ले, कर्मचारी बबलू समान, गजानन झगरे व अमोल पाटील यांनी पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गजानन तडसे हे करीत आहेत.