आरोपीस न्यायालयीन कोठडी
By Admin | Updated: September 20, 2014 22:08 IST2014-09-20T22:08:59+5:302014-09-20T22:08:59+5:30
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविणा-या आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत.

आरोपीस न्यायालयीन कोठडी
रिसोड (वाशिम) : पंधरा वर्षिय मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी २0 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत असलेल्या आरोपीस आज २0 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अल्पवयिन मुलीस फू स लावून पळवून नेल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी घडली होती. पोलीसांनी गुप्त माहितीनुसार सदर आरोपी अनिल अवसरमोल यास पुणे येथे १७ सप्टेंबर रोजी अटक केली. त्याला त्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. २0 सप्टेंबर रोजी त्याला न्यायालयात हजर केले असता विद्यमान न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपिची अकोला कारागृहात रवानगी करण्यात आली असल्याची माहिती ठाणेदार सुरेश राऊत यांनी दिली.