मारहाणप्रकरणी आरोपीस सहा महिने कारावास

By Admin | Updated: January 31, 2017 02:48 IST2017-01-31T02:48:25+5:302017-01-31T02:48:25+5:30

न्यायालयाने सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.

The accused has been sentenced to six months imprisonment | मारहाणप्रकरणी आरोपीस सहा महिने कारावास

मारहाणप्रकरणी आरोपीस सहा महिने कारावास

मानोरा, दि. ३0-उधारीच्या पैशांवरून झालेल्या हाणामारी प्रकरणातील आरोपीस न्यायालयाने सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायाधीश आर.बी. राजा यांनी सोमवार, ३0 जानेवारीला हा निकाल दिला.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, मानोरा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या कोंडोली येथील फिर्यादी रामदास रामचंद्र गवई हे २१ जून २0१६ रोजी रस्त्याने जात असताना त्यांना सुरेश रामजी शिंदे यांनी उधारीच्या पैशाची मागणी केली. यादरम्यान झालेल्या भांडणात आरोपीने फिर्यादीच्या डोक्यावर दगड मारून जखमी केले.
तपास अधिकारी दिलीप नरवाडे यांनी घटनेचा तपास करुन प्रकरण न्यायप्रविष्ट केल. न्यायालयाने एकूण नऊ साक्षीदारांचे बयान घेतले. त्यात गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीस कलम ३२४, ५0४, ५0६ भादंविनुसार सहा महिन्याची साधी कैद व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी एक महिन्याची शिक्षा, असा आदेश दिला.

Web Title: The accused has been sentenced to six months imprisonment