आरोपीस तीन वर्षे कारावास
By Admin | Updated: July 11, 2015 01:38 IST2015-07-11T01:38:59+5:302015-07-11T01:38:59+5:30
चार वर्षीय बालिकेवर अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करणा-या आरोपीस न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा.

आरोपीस तीन वर्षे कारावास
मंगरुळपीर (जि. वाशिम): शहरातील चार वर्षीय बालिकेवर अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करणार्या आरोपीस न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा तसेच १५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. उपरोक्तप्रकरणी फिर्यादीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत असे नमूद करण्यात आले होते, की सन २0१२ मध्ये आरोपी मोहन मंगरुळपीर शहरातील बहादरपुरा येथील रहिवासी वामनराव लाटे (४0) याने ४ वर्षीय मुलीवर अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. अशा तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपराध क्र.५४ -२0१२ कलम ३७५, ५११ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करुन तत्कालीन ठाणेदार दोनकलवार यांनी याप्रकरणी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यानंतर ९ जुलै रोजी कोर्ट क्र. २ चे न्याय दंडाधिकारी एल.एच. रोकडे यांनी आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. १५ हजार रुपयाचा दंडापैकी १0 हजार रुपये मुलीस देण्याचे आदेश दिले व दंड न भरल्यास अधिक ३ महिने कारावास अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अभियोक्ता अँड.एम.जी.शर्मा यांनी काम पाहिले तर स.पो. उपनिरीक्षक वाघाडे यांनी सहकार्य केले.