सरपंचासह एकावर गुन्हा दाखल
By Admin | Updated: March 6, 2015 02:10 IST2015-03-06T01:55:33+5:302015-03-06T02:10:08+5:30
शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीप्रकरण.

सरपंचासह एकावर गुन्हा दाखल
जऊळका रेल्वे (वाशिम): विहिरीच्या खोदकामाची परवानगी घेतली का, असे विचारले असता आरोपी अशोक प्रल्हाद गवळी (५0) व अमानी सरपंच संदीप अशोक गवळी यांनी दत्तराव ज्ञानबाराव गवळी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत दत्तराव गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.