युवतीला पळविल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 19:52 IST2017-07-30T19:52:00+5:302017-07-30T19:52:03+5:30

युवतीला पळविल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल!
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर (वाशिम) : लग्नाचे आमिष दाखवून महाविद्यालयीन युवतीला पळवून नेल्याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी युवकाविरूद्ध २९ जुलै रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणातील युवतीच्या वडिलांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की २९ जुलै रोजी सकाळी कॉलेजला जाते असे सांगून घरून निघून गेलेली त्यांची मुलगी उशिरापर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे तीचा शोध घेतला असता, तीला पवन दीपक क्षीरसागर (रा.बायपास रोड, मंगरूळपीर) याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे कळले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नमूद आरोपीविरूद्ध कलम ३६३, ३६६ भादंविअन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अशोक कांबळे करित आहेत.