नोकरीचे आमिष दाखविणारा आरोपी गजाआड

By Admin | Updated: December 17, 2015 02:35 IST2015-12-17T02:35:04+5:302015-12-17T02:35:04+5:30

नोकरीचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळून फसविणारा आरोपी तब्बल नऊ महिन्यांनी अनसिंग पोलिसांच्या जाळ्यात.

The accused accused of looting a job | नोकरीचे आमिष दाखविणारा आरोपी गजाआड

नोकरीचे आमिष दाखविणारा आरोपी गजाआड

अनसिंग : नोकरीचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळून फसविणारा आरोपी तब्बल नऊ महिन्यांनी अनसिंग पोलिसांच्या जाळ्यात १३ डिसेंबरला रात्री अडकला. अनसिंग पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या वाई येथील फिर्यादी विठ्ठल प्रेमसिंग चव्हाण यांनी ९ फेब्रुवारी २0१५ ला फिर्याद दिली की, आरोपी अनिल हिरामन राठोड (वय ३२ वर्षे) रा. अडगाव ता.पुसद जि.यवतमाळ यांनी आरोग्य खात्यात नोकरीस लावून देतो, असे आमिष दाखवून पाच लाख रुपये नगदी घेऊन फसवणूक केली. या फिर्यादीवरुन अनसिंग पोलिसांनी आरोपीविरुद्ध तपास सुरू केला. तेव्हापासून अनसिंग पोलीस आरोपीचा शोध घेत होते; परंतु पोलिसांचा सुगावा लागताच गावाबाहेर पळून जाणारा आरोपी तब्बल नऊ महिने फरार राहिला. १३ डिसेंबरला पोलीस उप-अधीक्षक विशाल तांबे, ठाणेदार ज्ञानेश्‍वर घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक सुभाष वंजारे, प्रकाश आहेर, रमेश चव्हाण, पोले, पोलीस कॉन्स्टेबल कोकणे यांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपीच्या अडगाव येथील घराभोवती सापळा रचला. अनिल राठोड हा घरी येताच पोलिसांनी त्याला पकडले. आरोपीविरूद्ध कलम ४२0, ४६५, ४७१, ३४ नुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. १४ डिसेंबरला न्यायालयात हजर केले असता आरोपीला १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Web Title: The accused accused of looting a job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.