सर्दी, खाेकला व तापाची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:44 IST2021-09-26T04:44:51+5:302021-09-26T04:44:51+5:30

गावातील नागरिकांना खासगी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा पैसे देऊन उपचार करावे लागत आहे. तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने एक वर्षांपासून अनेक ठिकाणी ...

Accompanied by cold, fever and fever | सर्दी, खाेकला व तापाची साथ

सर्दी, खाेकला व तापाची साथ

गावातील नागरिकांना खासगी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा पैसे देऊन उपचार करावे लागत आहे. तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने एक वर्षांपासून अनेक ठिकाणी पडलेले खड्डेसुद्धा बुजवले नाहीत व वार्ड नंबर २ मधील अनेक ठिकाणी रोडवर पाणी वाहत आहे. नाली साफसफाई नसल्यामुळे व नालीत घाण साचल्यामुळे अनसिंग येथील विठ्ठल रुक्माई मंदिराजवळील लठ्ठा यांच्या घरासमोर अनेक मोठे मोठे खड्डे साचले आहे. अनेक वेळेस या परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक मधूकर बोडखे यांना याबाबत कल्पना दिली. परंतु त्यांनी कधीच या परिसरात येऊन पाहणी केली नाही.

बाेडखे वाशिम येथून अनसिंग ला ये-जा करतात व ग्रा. पं. कार्यालयात बसुनच आपला कारभार सांभाळतात. विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्याची मागणी येथील प्रकाश राऊत यांनी केली आहे.

Web Title: Accompanied by cold, fever and fever