निवडणूक निर्णय अधिका-याचा आकस्मिक मृत्यू
By Admin | Updated: July 31, 2015 01:01 IST2015-07-31T01:01:16+5:302015-07-31T01:01:16+5:30
८ ग्रामपंचायतींच्या निवडणूक निर्णय अधिकारी पदाची जबाबदारी सोपविलेले कारंजा पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिका-याचा आकस्मिक मृत्यू.

निवडणूक निर्णय अधिका-याचा आकस्मिक मृत्यू
कारंजा लाड (जि. वाशिम): येत्या ४ ऑगस्ट रोजी कारंजा तालुक्यातील ज्या २८ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे, त्यातील ८ ग्रामपंचायतींच्या निवडणूक निर्णय अधिकारी पदाची जबाबदारी सोपविलेले कारंजा पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी राजकमल जाधव यांचा २९ जुलै रोजी मूर्तिजापूर येथे आकस्मिक मृत्यू झाला. राजकमल जाधव हे मूळचे मंगरुळपीर तालुक्यातील हिसई या गावचे रहिवासी होते. मंगरुळपीर येथील पंचायत समितीमध्ये आरोग्य विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असताना दोन वर्षांपूर्वीच त्यांनी कारंजा पंचायत समितीमध्ये बदली झाली होती. कारंजा तालुक्यातील कोळी, शिवनगर, भडशिवणी, पिंपळगाव खुर्द आणि सोहोळ या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. मूर्तिजापूर येथे २९ जुलै रोजी काही कामानिमित्त गेले असता त्यांचा तेथेच आकस्मिक मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही; परंतु त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याची चर्चा आहे.