माकड आडवे आल्याने अपघात

By Admin | Updated: October 17, 2016 02:17 IST2016-10-17T02:17:44+5:302016-10-17T02:17:44+5:30

कारंजा लाड येथे ऑटो अपघातात एक ठार; चार जखमी.

Accident of the Monkey Horizon | माकड आडवे आल्याने अपघात

माकड आडवे आल्याने अपघात

कारंजा लाड, दि. १६- माकड रस्त्यात आल्याने ऑटो उलटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास शेतकरी निवासजवळ ही घटना घडली. तुराब खान गुलाब खान (वय ५0) रा.शेलूबाजार असे मृतकाचे नाव आहे.
मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथून एमएच ३७ जी-७७९ क्रमांकाचा ऑटो प्रवाशांना घेवून धार्मिक कार्यक्रमासाठी कारंजा शहराकडे येत होता. अचानक एक माकड रस्त्यात आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ऑटो उलटून हा अपघात झाला. तुराब खान गुलाब खान यांच्या अंगावर ऑटो उलटल्याने ते जागीच ठार झाले. अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.

Web Title: Accident of the Monkey Horizon