लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : रोहिची धडक लागल्याने अपघात घडून दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना २ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास कारंजा-अमरावती मार्गावरील भडशिवणी फाट्यानजिक घडली. शेषराव यशवंत सावते (५५), असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते कारंजातील मुलजी जेठा हायस्कूलमधील शिक्षकेतर कर्मचारी असल्याचे कळले आहे. कारंजा येथील भिमनगरातील रहिवासी शेषराव यशवंतराव सावते हे त्यांच्या एमएच-३७ ई ००७२ क्रमांकाच्या दुचाकीने कामरगाव येथून कारंजाकडे परत येत असताना भडशिवणी फाट्यानजिक एक रोहि अचानक रस्त्यावर आडवा आल्याने दुचाकी व रोहिची जोरदार धडक झाली. या अपघातात सावते हे दुचाकीवरून खाली पडले. व त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद कारंजा ग्रामीण पोलिसांनी घेतली असून, अधिक तपास ठाणेदार गजानन गुल्हाणे यांच्या मार्गदर्शनात कारंजा गा्रमीण पोलीस करीत आहे.
कारंजा-अमरावती मार्गावर रोहिच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 15:18 IST
कारंजा लाड (वाशिम) : रोहिची धडक लागल्याने अपघात घडून दुचाकीस्वार ठार झाला.
कारंजा-अमरावती मार्गावर रोहिच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
ठळक मुद्देही घटना २ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास कारंजा-अमरावती मार्गावरील भडशिवणी फाट्यानजिक घडली. शेषराव यशवंत सावते (५५), असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.