महामार्गावर मालवाहू वाहनास अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:45 IST2021-08-27T04:45:11+5:302021-08-27T04:45:11+5:30
००००००००००००००००००००००००००० दोन दिवसांत सहा सापांना जीवदान वाशिम: वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीरच्या सर्पमित्र सदस्यांनी मानोरा व मंगरुळपीर तालुक्यात बुधवार ...

महामार्गावर मालवाहू वाहनास अपघात
०००००००००००००००००००००००००००
दोन दिवसांत सहा सापांना जीवदान
वाशिम: वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीरच्या सर्पमित्र सदस्यांनी मानोरा व मंगरुळपीर तालुक्यात बुधवार आणि गुरुवारी विविध आढळलेल्या पाच सापांना सुरक्षितपणे पकडत जंगलात सोडून जीवदान दिले. यात नाग या विषारी सापासह, कवड्या, वाळा, तस्कर आदी बिनविषारी सापांचा समावेश आहे. यासंदर्भात सर्पमित्रांनी वन विभागाला माहिती दिली आहे.
०००००००००००००
कार्यशाळेतून पशुपालनाबाबत मार्गदर्शन
वाशिम: समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत पशुसंवर्धन विभागाकडून सहभागी गावांत शेती जोड व्यवसायात पशुपालनाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यात विविध गावांत यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले जात असून, स्वत: पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नागरे या कार्यक्रमांत शेतकऱ्यांशी संवाद साधून दुधाळ जनावरांच्या जाती, त्यांच्यासाठी आवश्यक चारा, त्यांचे आरोग्य याबाबत मार्गदर्शन करत आहेत.
०००००००००००००
दिवसभरात ४०् वाहनांवर कारवाई
वाशिम: वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत वाहनधारकांत शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कारवाईची मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत जागमाथा परिसरासह वाशिम शहरातील पुसद नाका, पाटणी चौकात गुरुवारी एकाच दिवसांत ४० वाहनांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
०००००००००००००
कृषीदूतांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वाशिम : कृषी महाविद्यालय आमखेडाचे कृषीदूत शुभम काळे, गणेश धनगर, अभिषेक पतंगे, विशाल खोलगडे व विशाल मानवतकर यांनी तालुक्यातील ग्राम ब्राम्हणवाडा येथे २५ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना पिकांतर्गत मशागतीचे फायदे व महत्त्व तसेच शास्त्रशुद्ध मशागत कशा पद्धतीने करावी याबाबत मार्गदर्शन केले.
०००००००००००००