अ.भा. अंनिस युवा शाखेची वाशिम जिल्हा कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:45 IST2021-08-28T04:45:26+5:302021-08-28T04:45:26+5:30

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यपद्धती, समितीची देव-धर्म विषयक भूमिका यासह इतर विषयांची सखोल माहिती व प्रशिक्षण व्हावे या ...

A.B. Washim District Executive of Annis Youth Branch announced | अ.भा. अंनिस युवा शाखेची वाशिम जिल्हा कार्यकारिणी जाहीर

अ.भा. अंनिस युवा शाखेची वाशिम जिल्हा कार्यकारिणी जाहीर

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यपद्धती, समितीची देव-धर्म विषयक भूमिका यासह इतर विषयांची सखोल माहिती व प्रशिक्षण व्हावे या हेतूने नुकतेच तीन दिवसीय ऑनलाइन ‘महिला व युवा शाखा पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. या प्रशिक्षण कार्यशाळेत प्रशिक्षित युवक - युवतींची ऑनलाइन बैठक नुकतीच आयोजित करून ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या बैठकीला अध्यक्ष म्हणून अंबादास खडसे - जिल्हा संपर्क प्रमुख वाशिम, प्रमुख पाहुणे म्हणून महिला शाखा पश्चिम अमरावती विभाग संपर्क प्रमुख डाॅ. स्वप्ना लांडे, राज्य युवा शाखा नियोजन व संपर्क प्रमुख हर्षाली लोहकरे, वाशिम जिल्हा संघटक विजय भड, जिल्हा अध्यक्ष नाना देवळे, जिल्हा सचिव विलास गांजरे, माजी युवा शाखा सचिव सुयोधन देशमुख, वाशिम युवा शाखा जिल्हाध्यक्ष नीलेश मिसाळ, जिल्हा युवा संघटक युवराज राठोड आदी उपस्थित होते.

-----

अशी आहे युवा शाखेची जिल्हा कार्यकारिणी

वाशिम जिल्ह्याची युवा शाखेची कार्यकारिणी राज्य युवा शाखा नियोजन व संपर्क प्रमुख हर्षाली लोहकरे यांनी जाहीर केली. यामध्ये जिल्हा सचिव चंदन चव्हाण, जिल्हा सहसंघटक लक्ष्मी जाधव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून वैशाली सोळंके, अर्जुन सुर्वे, प्रा. पी.आर. तायडे, प्रफुल राऊत, आचल वाघमारे, प्रसेनजित पवार, रुपेश बाजड, विनोद मुसळे, अविनाश गायकवाड यांची निवड करण्यात आली.

-----

Web Title: A.B. Washim District Executive of Annis Youth Branch announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.