अ.भा. अंनिस युवा शाखेची वाशिम जिल्हा कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:44 IST2021-08-27T04:44:27+5:302021-08-27T04:44:27+5:30
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यपद्धती, समितीची देव-धर्माविषयक भूमिका यांसह इतर विषयांची सखोल माहिती व प्रशिक्षण व्हावे या हेतूने ...

अ.भा. अंनिस युवा शाखेची वाशिम जिल्हा कार्यकारिणी जाहीर
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यपद्धती, समितीची देव-धर्माविषयक भूमिका यांसह इतर विषयांची सखोल माहिती व प्रशिक्षण व्हावे या हेतूने नुकतेच तीन दिवसीय ऑनलाइन ‘महिला व युवा शाखा पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. या प्रशिक्षण कार्यशाळेत प्रशिक्षित युवक-युवतींची ऑनलाइन बैठक नुकतीच आयोजित करून ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या बैठकीला अध्यक्ष म्हणून अंबादास खडसे, जिल्हा संपर्कप्रमुख वाशिम, प्रमुख पाहुणे म्हणून महिला शाखा पश्चिम अमरावती विभाग संपर्कप्रमुख डाॅ. स्वप्ना लांडे, राज्य युवा शाखा नियोजन व संपर्कप्रमुख हर्षाली लोहकरे, वाशिम जिल्हा संघटक विजय भड, जिल्हाध्यक्ष नाना देवळे, जिल्हा सचिव विलास गांजरे, माजी युवा शाखा सचिव सूर्योधन देशमुख, वाशिम युवा शाखा जिल्हाध्यक्ष नीलेश मिसाळ, जिल्हा युवा संघटक युवराज राठोड उपस्थित होते.
हर्षाली लोहकरे यांनी यावेळी मार्गदर्शन करत पुढील एक वर्षासाठीची वाशिम युवा शाखा जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. यात, चंदन चव्हाण - जिल्हा सचिव, लक्ष्मी जाधव - जिल्हा सहसंघटक, जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून वैशाली सोळंके, अर्जुन सुर्वे, प्रा. पी. आर. तायडे, प्रफुल्ल राऊत, आचल वाघमारे, प्रसेनजित पवार, रूपेश बाजड, विनोद मुसळे, अविनाश गायकवाड यांची निवड करण्यात आली.