अमानवाडी येथील जुगार अड्डय़ावर धाड
By Admin | Updated: July 12, 2014 02:11 IST2014-07-12T02:10:19+5:302014-07-12T02:11:25+5:30
मालेगाव तालुक्यातील अमानवाडी येथील एका जुगार अड्डय़ावर धाड, १२ जणांना अटक

अमानवाडी येथील जुगार अड्डय़ावर धाड
वाशिम : मालेगाव तालुक्यातील अमानवाडी येथील एका जुगार अड्डय़ावर पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांच्या विशेष पथकाने ११ जुलैला दुपारी २ वाजताच्या सुमारास टाकलेल्या धाडीत १२ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ९ हजार ३0७ रुपये व तीन मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार कमलेश तायडे, मनोहर रत्नपारखी, सखाराम जाधव, किसन झळके, शांताराम लठाड, भगवान शेळके, कैलास मोघाड, सदाशिव वाघमारे, पुंजाजी सोळंके, दीपक जाधव बाळू धनगर, विलास करवते, देवीदास जावळे आदी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी जुगार अड्डय़ावर धाड टाकून उपरोक्त १२ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ हजारांचा ऐवजही जप्त केला आहे.