शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

वाशिम जिल्ह्यातील दीड लाखावर जनावरांना ‘आधार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2021 11:08 AM

Washim News दीड लाखांहून अधिक जनावरांना आधार मिळाला असून, संकेतस्थळावर  एक लाख ३४ हजार जनावरांची नोंदणी झाली.

ठळक मुद्देआधार क्रमांक देण्यासाठी कानात बिल्ला टोचण्यात येत आहे.आधार क्रमांक नसेल तर जनावरांची खरेदी-विक्री करता येणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील पाळीव जनावरांना १२ अंकी आधार क्रमांक दिला जात आहे. आतापर्यंत दीड लाखांहून अधिक जनावरांना आधार मिळाला असून, संकेतस्थळावर  एक लाख ३४ हजार जनावरांची नोंदणी झाली.राष्ट्रीय रोगनिर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील जनावरांना लाळ्या खुरकुत रोगप्रतिबंधक लसीकरण व आधार क्रमांकासारखाच ओळख क्रमांक दिला जातो आहे. जिल्ह्यात साडेतीन लाखावर पाळीव जनावरे असून, राज्याचा पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत या जनावरांना आधार (ओळख) क्रमांक देण्यासाठी कानात बिल्ला (टॅगिंग) टोचण्यात येत आहे.हा टॅग म्हणजेच जनावरांचा ओळख क्रमांक किंवा आधार क्रमांक आहे. या आधार क्रमांकाची ऑनलाइन नोंद शासनाच्या संकेतस्थळावर घेण्यात येत आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची फौज तैनात आहे. आधार क्रमांक नसेल तर जनावरांची खरेदी-विक्री करता येणार नाही.

‘आधार’ असेल तरच विमा मिळणारजनावरांची खरेदी-विक्री, नुकसानभरपाई किंवा विमा मिळण्यासाठी यापुढे आधार क्रमांक आवश्यक असणार आहे. नैसर्गिक आपत्तीत जनावरे दगावल्यास शासनाकडून भरपाई दिली जाते. या आधार क्रमांकाशिवाय नुकसानभरपाई तसेच विमा मिळणार नाही, असे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जनावरांना ‘आधार’ मिळावा याकरिता पशुपालकही पशुवैद्यकीय दवाखान्याकडे धाव घेत असल्याचे दिसून येते. 

पाळीव जनावरांची ओळख म्हणून १२ अंकी आधार क्रमांक (टॅगिंग) दिला जात आहे. आधार क्रमांक असेल तरच नुकसानभरपाई, विमा आदीचा लाभ मिळणार आहे. पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना, पशुवैद्यकीय केंद्रात जाऊन जनावरांना आधार क्रमांक घ्यावा. -डॉ. विनोद वानखडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प., वाशिम

टॅग्स :washimवाशिमAdhar Cardआधार कार्ड