१२ हजार बालकांची आधार नाेंदणी प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:40 IST2021-04-25T04:40:33+5:302021-04-25T04:40:33+5:30
जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्रे असून, यामध्ये जवळपास ८८ हजार बालकांची नोंद झालेली आहे. अंगणवाडी केंद्रातील बालकांना पोषण आहार व ...

१२ हजार बालकांची आधार नाेंदणी प्रभावित
जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्रे असून, यामध्ये जवळपास ८८ हजार बालकांची नोंद झालेली आहे. अंगणवाडी केंद्रातील बालकांना पोषण आहार व अन्य योजनांचा लाभ देण्यासाठी आधार नोंदणी आवश्यक आहे. आधार नोंदणी न झालेल्या बालकांना ऑफलाइन पद्धतीने योजनांचा लाभ देण्यात येतो. दरम्यान, अंगणवाडी केंद्रातील बालकांची आधार नोंदणी करण्यासाठी अंगणवाडी केंद्रातच पर्यवेक्षिकांना जवळपास ४० टॅब पुरविण्यात आले होते. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर बालकांची आधार नोंदणी सुरू केली जाणार होती; परंतु गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने २४ मार्चपासून देशात लाॅकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून आधार नोंदणीदेखील प्रभावित झाली. मध्यंतरी कोरोनाचा आलेख खाली आल्याने नोंदणी पूर्ववत होत असताना, गत दोन महिन्यांपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. त्यामुळे आधार नोंदणी पुन्हा प्रभावित झाली.