मतदार कार्डला दिली जातेय आधार कार्डची जोड

By Admin | Updated: May 18, 2015 01:33 IST2015-05-18T01:33:57+5:302015-05-18T01:33:57+5:30

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे विशेष शिबिर; शिबिराला मतदारांचा प्रतिसाद.

Aadhaar card attachment is given to voter card | मतदार कार्डला दिली जातेय आधार कार्डची जोड

मतदार कार्डला दिली जातेय आधार कार्डची जोड

वाशिम : बोगस मतदार वगळणे आणि अचूक मतदार यादी बनविण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालयाने मतदारकार्डाला ह्यआधारह्णची जोड देण्याबाबत १७ मे रोजी जिल्हय़ातील प्रत्येक मतदार केंद्रावर विशेष शिबिर घेण्यात आले. वाशिम तालुक्यात या शिबिराला मतदारांचा बर्‍यापैकी सहभाग मिळाल्याची माहिती तहसीलदार आशीष बिजवल यांनी दिली.
राज्य व केंद्र सरकारच्यावतीने देशभरातील मतदारांची लिंक आधार कार्डशी जोडण्याची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मतदारांची छायाचित्र, मतदार ओळखपत्रातील माहिती व आधार कार्डमधील माहिती यांची सांगड घालणे व ती माहिती प्रमाणित करण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. मतदारांची लिंक आधार कार्डशी जोडून बोगस मतदानकार्डला आळा बसविणे, एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदार नोंदणी असलेल्या मतदाराचे अन्य ठिकाणचे नाव वगळणे, मतदार यादीमधील चुका, मतदार ओळखपत्रामधील दुरुस्त्या करणे आदी सुधारणा या लिंकमुळे शक्य होणार आहेत. वाशिम जिल्हय़ात १७ मे रोजी एकाच दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर या मोहिमेंतर्गत मतदारांकडून अर्ज भरून घेण्यात आले. ऑनलाईनद्वारे मतदार कार्डला आधारशी लिंक कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वाशिम तालुक्यात १९२ मतदान केंद्र अधिकारी आणि १९ सुपरवायझर या शिबिरासाठी तैनात केले होते. १७ मे रोजी वाशिम शहरातील व तालुक्यातील मतदार केंद्रावर मतदारांना माहिती देण्यात आली.

Web Title: Aadhaar card attachment is given to voter card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.