शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

खंडनी न दिल्याने कुख्यात गुंडानं केली युवकाची हत्या, अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील घटना

By सुनील काकडे | Updated: April 22, 2023 19:16 IST

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अवघ्या तीन तासांत अटक केली आहे.

वाशिम - जिल्ह्यातील धनज बु. (ता.कारंजा) येथील एका युवकास कुख्यात गुंडाने खंडनी मागितली. ती न दिल्याने त्याने त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अवघ्या तीन तासांत अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, कारंजा तालुक्यातील धनज येथील केवल माणिकराव सोनटक्के (२७) हा युवक वरूड येथे ऑनलाईन लाॅटरीचे दुकान चालवित होता. त्याच्याकडे फंट्या उर्फ दिपक अशोक कावनपुरे या कुख्यात गुंडाने पैशाची मागणी केली. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी फंट्याने केवल सोनटक्के याच्या मानेवर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले आणि घटनास्थळावरून पोबारा केला.यावेळी नागरिकांनी धावपळ करून केवलला वरूडच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. फिर्यादी अकुंश जोगदंड (परभणी) याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी फंट्या उर्फ दिपक अशोक कावनपूरे याच्यावर भादंविचे कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून स्थानिक मुलताई चाैकातून अवघ्या तीन तासात त्याला जेरबंद केले.

फंट्यावर यापूर्वी विविध गुन्हे दाखलआरोपी फंट्या हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर यापूर्वी तडिपारी आणि एमपीडीएची कारवाई सुध्दा झाली आहे. मागील एक महिण्यांपूर्वी तो तडिपारी भोगून आला होता. त्याच्यावर अवैध दारूविक्री व मारहाणीचेही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwashimवाशिमPoliceपोलिस